Posts

घबाड

    आयुष्य जगत असताना पावला पावलांवर आपल्याला वेगवेगळं घबाड मिळत असते मग ते दुःखाचं असेल, संघर्षाचं असेल, प्रेमाचं असेल,विरहाचं असेल, नात्याचं असेल, स्वप्नांचं सुध्दा असू शकते बस ते सावडून घ्यायला आपले हात आणि मन मोकळं असलं पाहिजे.       डोळ्यात निराशेचे ढग साठवून आपण कुठल्याही घबाडाला स्पष्टपणे पाहू शकत नाही किंवा गर्दी झालेल्या डोळ्यात जागा देऊ शकत नाही म्हणून नेहमी चेहऱ्यावर हसू ठेवूनच घबाड मिळवू शकतो आणि अनुभवांची तिजोरी श्रीमंत होऊ लागते .जोपर्यंत अनुभवांची दौलत पाठीशी बाळगून राहू, जीवनाचा प्रत्येक खडतर प्रवास सुकर होऊन जाईल.        घबाड कधीही मिळू देत त्याचे स्वागत करायला तयारच राहू कारण काय माहीत कुठल्या दिवशी जीवन बदलून जाईल. चला कंबर कसा आणि घबाड साठवून स्वतः ला समृध्द करूया. घबाड म्हणजे अजून काय ते!            घबाडाची व्याख्या व्यक्तीनुसार बदलत असते आणि प्रत्येकजण आपल्या हव्या असणाऱ्या घबाडा च्या शोधत असतो तुम्ही कशाच्या आणि कुठल्या घबाडा च्या शोधात आहात नक्कीच कळवा बरं!